फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी आगीच्या घटना

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आठ किरकोळ आगीच्या घटना घडल्या आहेत. यात एका सोसायटीच्या फ्लॅटच्या गॅलरीत आग लागली होती अशी माहिती पिंपरी-चिंचवडच्या अग्निशमन विभागाने दिली आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील दीपावली सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दीपावली सण साजरा करण्यात आला. सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाक्यांची आतषबाजी केल्याने आसमंत उजळून निघाला. लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी फटाके फोडण्याचा आनंद घेतला. पण याच फटाक्यांमुळे काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. पिंपरी, वाकड, बिजलीनगर यासह इतर सात- ते आठ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. नाराळाच्या झाडावर फटाका फुटल्याने आग लागली होती. अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply