एआयबाबतचा आपला उत्साह किती वैज्ञानिक आहेआणि किती उपभोक्तावादी? एआयमुळे निर्माण होणाऱ्यावास्तविक शक्यता किंवा आव्हानांबाबत आपण जागरूकआहोत का? की आपण त्याला फक्त वापरात येणारी अशीगोष्ट समजत आहोत, ज्यामुळे आपली बरीचशी कामेसोपी होतील? किंवा असा धोका ज्यामुळे अनेक नोकऱ्याजातील? किंवा ज्यामुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील? दिल्लीत नुकत्याच संपन्न झालेल्या ‘एआय समिट’दरम्यान जी चर्चा झाली, त्यातून साधारणपणे याच सर्वगोष्टी समोर येत राहिल्या. एआय आपल्यासाठी शेती सोपीकरेल, व्यापार सोपा करेल, उपचार सोपे करेल, काहीनोकऱ्या संपवेल तर नवीन नोकऱ्या निर्माण करेल. याचर्चेत या उपभोक्तावादी समजुतीसोबतच ही घोषणाहीजोडलेली होती की, भारत येणाऱ्या वर्षांत एआय क्रांतीच्यामागे चालणार नाही, तर तिला आकार देईल. यात शंका नाही की, एआय हे एका अशा क्रांतीचेआगमन आहे, ज्याच्या वास्तविक परिणामांपासून आपणअद्याप अनभिज्ञ आहोत. जाणकार याला औद्योगिकक्रांतीपेक्षा मोठी क्रांती मानताहेत, ज्यानंतर जग बदलून गेलेहोते. युवल नोआ हरारी यांनी आपल्या “नेक्सस” यापुस्तकात याच्या धोक्यांपासून सावध केले आहे. त्यांच्यामते, एआय माहितीचा अणुबॉम्ब ठरेल. त्याहून मोठी चिंताही आहे की, मानवी संस्कृतीसमोर पहिल्यांदाच असे यंत्रआहे, जे स्वतः निर्णय घेऊ शकते. लष्करी उपक्रम किंवाअणु मोहिमांमध्ये याचा वापर धोकादायक ठरू शकतो.एआयमुळे माहिती ग्रहण करण्याची आपली क्षमता,संवेदना वाहून नेण्याचा आपला सराव यात बरेच काहीबदलू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठीकविता-कादंबरीही लिहून देईल आणि टीव्ही मालिकाहीबनवून देईल. या दृष्टीने या नवीन प्रयोगासमोर आपल्यालाकाही प्रमाणात सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे.पण आपण वातावरण असे काही बनवून ठेवले आहे की,आपण ही एआय क्रांती प्रत्येक ठिकाणी अमलात आणू -मग ते शिक्षण, आरोग्य असो किंवा इतर कोणतेही क्षेत्र.शाळा-कॉलेजांमध्ये शिकवण्यासाठी नवनवीन एआयमॉडेल्स सादर केली जात आहेत, पण एआय जर मुलांनाशिकवेल, तर त्यांचा नैसर्गिक विकास होऊ शकेल का? स्लेट किंवा वहीवर रेषा ओढणे, आकार बनवणे, अक्षरेशिकणे, वाक्ये तयार करणे इत्यादी जी प्रक्रिया असते,ज्यामध्ये बोटांत धरलेली पेन्सिल किंवा लेखणी सहायकअसते आणि ज्यामध्ये अनेकदा स्वतःचेलिहिलेले-रचलेले पुसण्याची किंवा काटण्याची गरजहीभासते, ते वास्तविक शिक्षण आहे. हे केवळ शब्दज्ञाननाही किंवा इतिहास-भूगोल, गणित-विज्ञानाचा असा धडानाही जो एआयने शिकवावा आणि तो घेऊन मुलांनीजीवनाच्या मैदानात उतरावे. वही-पेन्सिल-रबरनेघासून-घासून संयमाने सर्व काही शिकणारी मुलेचिकाटीने शिकतात, ती जीवनातील चढ-उतार आणिनवनिर्मिती सहजपणे हाताळू शकतात, पण एआयच्याकोरीव ज्ञानातून बाहेर पडलेली मुले तितकीच यांत्रिक असूशकतात, जितके कृत्रिम बुद्धिमत्तेचे मॉडेल. नक्कीच, तंत्रज्ञानाला घाबरण्याची गरज नाही - हेइतिहासाने सांगितले आहे. मात्र, माझ्यासारख्या लोकांचीकाळजी ही आहे की इंटरनेटने आपली स्मृती हिरावूनघेतली, आता एआय आपली कल्पनाशक्ती हिरावून ननेवो. आता आपण काहीही लक्षात ठेवत नाही, सर्व काहीनेटवर शोधतो - आप्तस्वकीयांची नावे-पत्ते-नंबर आणित्यांच्या घरापर्यंत नेणारे रस्ते सुद्धा. तंत्रज्ञानाचे पुढचेआक्रमण आपल्या कल्पनाशक्तीवर होणार आहे, कारणआपण सर्व चित्रे, सर्व नकाशे, सर्व कलात्मक वस्तूएआयकडून बनवून घेण्याची कल्पना करत आहोत.एआयचे आगमन हे एक वास्तव आहे. या जगात वैज्ञानिकपद्धतीने उतरलो, तरच खऱ्या अर्थाने एआय क्रांतीलाआकार देण्यात काही योगदान देऊ शकू, पण जर व्यापारीकिंवा सजावटीच्या-दिखाऊ पद्धतीने विचार केला, तरमात्र हसे करून घेऊ. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel



Share your link and rake in rewards—join our affiliate team!