प्रवासासाठी बूस्टर डोस आवश्यक, केंद्रानं धोरण ठरवावं : पूनावाला

पुणे : सध्या देशात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. अनेकांचे कोरोना लशीचे दोन्ही डोस झाले आहेत. दोन्ही डोस झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी परवानगी दिली आहे. पण, प्रवासासाठी बूस्टर डोस देखील गरजेचा आहे. सरकारने पुढच्या काही दिवसांत बूस्टर धोरण जाहीर (Booster Dose Policy) करावं, असं सिरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले.

मोदी सरकारने जवळपास सर्वांना कोरोना लशीचे दोन डोस दिले आहेत. आता सरकारने बूस्टर डोस द्यावे. प्रवासात कोरोनापासून बचावासाठी बूस्टर डोस देखील गरजेचे आहेत. त्यामुळे मोदी सरकारने धोरण ठरवावं, असं अदर पूनावाला म्हणाले. ते 'साम टीव्ही'सोबत बोलत होते.

भारतातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. पण, युकेमध्ये सापडलेल्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. हा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या सबव्हेरियंटपेक्षाही घातक असून त्याची संक्रमणक्षमता १० टक्के अधिक आहे, असं जागितक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बूस्टर डोस घेतला तर आपण कोरोनाच्या पुढील लाटेवर मात करू शकणार का? याबाबत अदर पूनावाला म्हणाले, ''आपल्या देशातील लसींचा नव्या व्हेरीयंटवर चांगला परीणाम झाला आहे. आपल्या लशी सकारात्मक काम करतात. पण, कोरोनाच्या पुढील लाटेसाठी बूस्टर डोस आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने आताच धोरण जाही करावं. पण बूस्टर देताना दोन लशींचे मिश्रण की तीच लस द्यायची हे ठरवायला हवं.''

कोरोनाचा नवीन व्हेरियंट युकेमध्ये सापडला असून त्याचे नाव XE असे आहे. हा ओमिक्रॉनचे दोन सबव्हेरियंट BA.1 आणि BA.2 या दोनचे मिश्रण आहे. तसेच याची संक्रमणक्षमता ही ओमिक्रॉनपेक्षा १० टक्के अधिक आहे. आतापर्यंत सर्वात वेगानं पसरणारा हा व्हेरियंट आहे. युकेमध्ये या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली आहे. पण, अद्याप भारतात रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. अनेक राज्यातील निर्बंध उठविण्यात आले आहेत. देशात मास्क घालणे ऐच्छिक ठेवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले आहे. त्यापाठोपाठ दिल्ली आणि इतर राज्यांनी देखील कोरोनाचे निर्बंध उठवले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply