पोलिस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; नक्षल कमांडरसह दोन माओवादी ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडा-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलविरोधी अभियानात उतरलेल्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक  झाली. जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवादी जंगलाचा फायदा घेत पळून गेले. शोध घेत असताना दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. ज्यामध्ये एक पेडारस एलओएस कमांडर आणि डीव्हीसी सुरक्षा दलाच्या सदस्याच्या समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा अनेक घटनांमध्ये सहभाग आहे. काटेकल्याण पोलिस ठाण्याच्या जियाकोर्था, गोर्ली, मुथेली आणि दानिकोर्था भागातील जंगलात मोठ्या संख्येने माओवादी जमले होते. मंगळवारी सकाळी दंतेवाडा डीआरजी, सुकमा डीआरजी, सीआरपीएफ २३० वी बटालियन आणि छत्तीसगड सशस्त्र दलाच्या संयुक्त पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास जवान गोर्ली आणि मुथेली गावादरम्यानच्या जंगलात पोहोचले असता घातात आलेल्या माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनीही मोर्चा काढून चोख प्रत्युत्तर दिले. जवान हावी होत असल्याचे पाहून नक्षलवाद्यांनी जंगलाचा फायदा घेत पळ काढला, असे एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले. चकमकीनंतर सुरक्षा दलांनी गोर्ली-मुथेली जंगलात शोध घेतल्यानंतर दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. पेडारस एलओएस कमांडर मंजुला पूनम आणि डीव्हीसी सुरक्षा दल सदस्य मुचकी गंगी अशी या महिला माओवाद्यांची ओळख पटली आहे. घटनास्थळावरून १२ बोअरच्या दोन रायफल, एक देशी बनावटीचे शस्त्र, स्फोटके आणि नक्षलवाद्यांचे कॅम्पिंग साहित्य जप्त करण्यात आले. चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जवानांकडून परिसरात शोध घेण्यात येत आहे, असे एसपी सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply