पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक, अलका टॉकीज चौकात आंदोलन

महाराष्ट लोककसेवा आयोगाने MPSC) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याविरोधात 2 मे रोजी    पुण्यातील अलका टॉकीज चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न वगळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी तिसऱ्या उत्तरतालिका आणि मुंबई, औरंगाबाद, नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई मॅटने एमपीएससीच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पुन्हा १७ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply