पुण्यात ११ मार्गांवर पीएमपीएमएल बस सेवा होणार कायम बंद; ग्रामीण भागातील नागरीकांचा वाढणार त्रास

पुण्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ग्रामीण भागातील वाहतुकीविषयी पीएमपीएमएलकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या २६ नोव्हेंबर पासून या भागातील ११ मार्गावरील पीएमपीएमएल बस सेवा बंद करण्यात येणार आहेत.

 
अशात पीएमपीएमएलने घेतलेल्या या निर्णयाचा काही ग्रमीण नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात रोजचा प्रवास करणाऱ्या तुरळक व्यक्ती आहेत. त्यामुळे बस सेवाचा पर्याय बंद केल्याने या नागरिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *