पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम

पुणे  : राज्यात सध्या गारठा  (Temperature)वाढत आहे. थंड हवेचं ठिकाण असलेलं महाबळेश्वरपेक्षादेखील कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कमी तापमान पुणेकर अनुभवत आहे. रविवारी पुण्यात 13.3 अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर महाबळेश्वरमध्ये 13.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

सलग दोन दिवस (11-12 नोव्हेंंबर) सर्वात कमी किमान तापमानाची नोंद पुण्यात (Pune weather) झाली आहे. पुण्यात 12.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं होतं. सरासरीच्या तुलनेत हे तापमान 3.2 अंशाने घटलं होतं. शुक्रवारी शहरातील रात्रीचे तापमान 12.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, (Meteorological Department) राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन उत्तर भारतापाठोपाठ महाराष्ट्रातील किमान तापमान कमी झालं आहे.

दिवाळीनंतर शहरातील वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर ऊन्हाचा कडाका जाणवतो तर रात्री प्रचंड प्रमाणात थंडी असते. त्यामुळे पुणेकर सध्या गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येत देखील हळूहळू वाढ होताना दिसत आहे आणि पुढील काही दिवसांत रात्रीच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असे IMD अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम राहणार आहे आणि त्यानंतर गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. 

राज्यात गारठा वाढला आहे. राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये तापमानात घट झाली आहे. त्यात पुणे  : 13.3, महाबळेश्‍वर-13.4, नाशिक-14.3, सातारा-15, औरंगाबाद-14.2, नागपूर-15 या शहरांंचा समावेश आहे. येत्या काही दिवसात राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्यासह राज्याच्या दक्षिण मध्य भागात ओलावा सुरु झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. रात्री किमान तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारच्या दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान 13 ते 14 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, असं अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुण्यात यंदा भरपूर प्रमाणात पाऊस झाला यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं. दिवाळीच्या आधीपर्यंत पुण्यात सतत पाऊस सुरु होता. मात्र दिवाळी झाल्यानंतर पुण्यातील तापमानात घट झाली आहे. राज्यात सगळ्यात कमी तापमानाची नोंद पुण्यात झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply