पुण्यात ‘हर हर महादेव’ सिनेमाच्या शो ला मनसेकडून संरक्षण

पुणे शहरातील बंद करण्यात आलेले हर हर महादेव या चित्रपटाचे शो पुन्हा सुरू करण्यासाठी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,राज्य सरचिटणीस अजय शिंदे, बाबू वागसकर हे कोथरूड येथील सिटी प्राईडमध्ये कार्यकर्त्यांसह दाखल झाले असून, त्यांच्या उपस्थितीमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो प्रेक्षकांसाठी सुरु करण्यात आला आहे.

आजपासून शहरातील प्रत्येक सिनेमागृहात हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू राहणार असून, प्रेक्षकांनी येऊन हा चित्रपट पहावा. हा चित्रपट पहात असताना प्रेक्षकांना मनसेकडून संरक्षण कवच देण्यात येणार आहे. केवळ राज ठाकरे यांचा आवाज असल्याने या चित्रपटाला विरोध केला जात आहे. पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,राज्य सरचिटणीस अजय शिंदे, बाबू वागसकर या नेत्यांनी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन हर हर महादेव चित्रपट पहावा असे आवाहन केले आहे.

हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांना विरोध करण्यासाठी जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर खळखट्याक होणारच ..! पुण्यात बंद केलेले हर हर महादेव चित्रपटाचे शो आज दुपार पासून मनसे पुन्हा चालू करत आहे – अजय शिंदे ,मनसे प्रदेश सरचिटणीस

 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply