पुण्यात सीएनजी दरवाढीचा भडका, मध्यरात्रीपासून सीएनजी महागला

पुणे : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या पुणेकरांना पुन्हा एक महागाईचा नवीन झटका बसणार आहे. कारण, पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. 

आजपासून सीएनजीच्या दरात एक रुपयांनी वाढ काण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना एक किलो सीएनजीसाठी 92 रुपये मोजावे लागणार आहे. दीड महिन्यानंतर सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी धारक वाहकाच्या खिशाला कात्री बसणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहनं असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारणं आहे.

दरम्यान, आता पुन्हा सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना 1 किलो सीएनजीसाठी 92 रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक तसेच रिक्षा चालकांना फटका बसला आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply