पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पुण्यात पेट्रोलचे दर 120 रुपये लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलने देखील शंभरी पार केली आहे. महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या पुणेकरांना आणखी एक धक्का बसला आहे कारण सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे 5 रुपयांची वाढ झाली आहे. आता पुणेकरांना सीएनजीसाठी 68 रुपये ऐवजी 73 रुपये मोजावे लागणार आहे. हे नवीन दार आजपासून लागू करण्यात आले आहेत. 

सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित वायूची वाढ झाली आहे त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. त्या विशिष्ट गॅसची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारात दुप्पट झाली आहे तयामुळे सीएनजीचे भाव वाढवण्यात आले आहेत. सीएनजी गॅस प्रति किलो 5 रुपयांनी महाग झाल्याने याचा मोठा फटका पुणेकरांना बसणार आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग सातव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मार्चपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होती. मात्र गेल्या 7 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply