पुण्यात रिक्षा चालकांचा संप अखेर स्थगित; रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी चंद्रकांत पाटील यांची मध्यस्थी

पुण्यातील रिक्षा चालकांचा संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रिक्षा संघटनेने संप मागे घेतला आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आश्वासन मिळाल्याचा दावा रिक्षा संघटनेकडून करण्यात आला आहे.

पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेने जाहीर केलेला संप केलेला अखेर स्थगित करण्यात आला आहे. रिक्षा चालकांच्या प्रश्नावर समिती स्थापन करण्याचे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मिळाले असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे रिक्षा संघटनेने १० दिवसांसाठी संप स्थगित केला आहे. रिक्षा चालकांचा प्रश्न न सुटल्यास ११ तारखेपासून पुन्हा संप करणार असल्याचा इशारा रिक्षा संघटनेकडून देण्यात आला आहे.

बघतोय रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, 'रिक्षा संघटनेने २८ नोव्हेंबर रोजी बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन पुकारलं होतं. रिक्षा संघटनेने आज, सोमवारी पुकारलेले आंदोलन शांततेत पार पडले. आज, सायंकाळी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली. तेव्हा चक्रे फिरली. त्यानंतर प्रशासनाने निर्णय घेण्यास सुरुवात केली'.

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार रिक्षा चालकांच्या प्रश्नावर समिती स्थापन करण्यात येणार आहे. १० दिवसांच्या आत रिक्षा चालकांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास १२ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्यात येईल. नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि प्रशासनाला वेळ देण्यासाठी आम्ही १० दिवसांसाठी संप मागे घेत आहोत, असेही केशव क्षीरसागर म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply