पुण्यात राज ठाकरे यांच्याहस्ते ‘हनुमान चालिसा’चे होणार पठण

पुणे: हनुमान जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते पुण्यातील मारुती मंदिरात आरती होणार आहे, आजच्या या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. कारण गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यां संदर्भात जे वक्तव्य केले होते, त्याचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले होते. याशिवाय ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसेने राज्य सरकारला अलटीमेटम दिला आहे.

ही आरती आज शनिवारी (१६ एप्रिलला) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे.

हनुमान जयंती निमित्त आज या ठिकाणी हनुमान चालिसा'चे पठण होणार आहे. या कार्यक्रमाला पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालीसा लावा असा आदेश मनसैनिकांना दिला होता. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ में पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शनिवारी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत. दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply