पुण्यात प्रत्येक रस्त्यावर १५ दिवसांनी होणार अतिक्रमण कारवाई

पुणे महापालिका  प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर एक दोन दिवसानंतर पुन्हा एकदा अतिक्रमणे थाटली जात आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रत्येक रस्त्यावर १५ दिवसांनी अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी अनधिकृत पत्र्याचे शेड किंवा इतर प्रकारचे बांधकाम करून नुकसान करून घेऊ नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पुणे महापालिकेने गेल्या महिन्याभरापासून फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन, पादचारी मार्ग, नदी, नाल्यांच्या कडेचे अनधिकृत बांधकाम यावर कारवाईसाठी संयुक्त मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन दिवस कारवाईचे नियोजन केले जात आहे. महापालिकेने यामध्ये आत्तापर्यंत लाखो चौरस फुटाचे बांधकाम जमीनदोस्त केले आहे. महापालिकेवर प्रशासक असे पर्यंत शहराच्या सर्व भागात याच पद्धतीने कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

महापालिकेकडून दुकानांवर अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर त्यांच्या दोन तीन दिवसानंतर पुन्हा अतिक्रमण थाटले जात आहे. पत्र्याचे शेड, ताडपत्री टाकून दुकानासमोरील, इमारतीसमोरील जागा व्यापली जात आहे. त्यामध्ये इतर स्टॉलही सुरू झाले आहेत. तसेच सारसबाग चौपाटी, स्वारगेट चौक, शनिवारवाडा परिसर, जंगली महाराज रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता) यासह इतर भागातील अतिक्रमण पुन्हा उभी राहिली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईची परिणामकारता दिसून येत नाही.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार म्हणाले, ‘महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. कारवाईनंतर संबंधित भागात १५ दिवसानंतर पुन्हा एकदा मोहीम घेतली जाईल. नागरिकांनी अतिक्रमण करून नुकसान करून घेऊ नये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply