पुण्यात पबवर कारवाई; आवाजाची मर्यादा ओलांडल्याने गुन्हे

पुणे : आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या बंडगार्डन रस्ता परिसरातील दोन पबवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एक लाख ७० हजार रुपयांची ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त केली.बंडगार्डन रस्त्यावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी राजा बहाद्दुर मिलच्या आवारात वन एट कम्युन बार आणि मिलर्स लक्झरी क्लब या पबमध्ये रात्री दहानंतर मोठ्या आवाजात ध्वनिवर्धकांचा वापर करण्यात येत होता.

आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पर्यावरण संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल करून एक लाख ७० हजार रुपये किंमतीचे ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त करण्यात आली.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे आणि पथकाने ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply