पुणे हादरलं! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीसोबत सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नराधमांनी आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावर हे नराधम थांबले नाहीत तर बलात्कार केल्यानंतर त्या नराधमांनी तिचे लग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

पीडित मुलीने सर्व घटना आपल्या आईला सांगितली त्यानंतर चतू:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, किरण जावळे, शुभम जाधव, सुनील जाधव आणि अनिल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला होता.

आरोपी अनिल जाधव यांनी चाकूचा धाक दाखवून पीडित मुलीचे अपहरण केले. त्यानंतर एका लॉजवर तिला घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी वेळोवेळी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले होते. चतू:शृंगी पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *