पुण्यात गणेशोत्सवाला वादाने सुरुवात, अफजल खानाच्या वधाच्या देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली, मंडळ संतप्त

पुणे : पुण्यामध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये देखावे सजवण्याचे काम मंडळाने हाती घेतले आहे. अशातच पुण्यात आता नवीन वाद समोर आला आहे. एका गणेश मंडळाला पोलिसांनी अफझल खान वधाचा जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. कोरोनाच्या काळात नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पण, यंदा सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव जोरदार तयारी लागले आहे. अशातच पुण्यातील कोथरूड परिसरातील संगम तरुण मंडळाचा वाद समोर आली आहे. अफझल खान वधाच्या जिवंत देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात संगम तरुण मंडळाने यावर्षी 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या हिंदुस्थानात महाराजांचा जीवनपट दाखवण्याची भीती वाटत असेल तर मग काय पाकिस्तानात जाऊन दाखवायचा का? हेच का हिंदूत्ववादी सरकार? असा सवाल शिंदे यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात शिवरायांचा ज्वलंत आणि जीवंत ऐतिहासिक देखावा सादर करण्यास पोलीस प्रशासनाचा नकार दिला आहे. कोथरुड ध्ये वर्षानुवर्ष ऐतिहासिक सजीव देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या संगम तरुण मंडळाच्या सन २०२२ च्या देखाव्यात इतिहासाच्या पुस्तकात आम्ही जे शिकलो तेच देखावा स्वरुपात मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. अजूनही आम्ही आशा सोडली नाही. सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच यावर तोडगा काढावा, अशी मागणीही शिंदेंनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply