पुण्यात खळबळ! कात्रजमध्ये खुनानंतर मृतदेह लोखंडी पाइपला लटकावला

पुण्यातील कात्रज भागात एका महिलेने मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला. प्रकाश किसन जाधव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, शालन जाधव असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पतीचा मृतदेह लोखंडी पाईपला बांधून ठेवण्यात आला होता. त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण होतं.

कात्रज येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रकाश जाधव यांचा मृतदेह आढळला. पोस्टमॉर्टम अहवालात त्यांचा गळा दाबल्याने आणि डोक्यात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यासंदर्भात पोलिसांनीही अधिक माहिती दिली आहे. तपासादरम्यान पत्नी आणि मुलाने हे कृत्य केल्याचं स्पष्ट झालंय. तर, पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्याकडे संबंधित गुन्ह्याचा तपास आहे. पत्नीला अटक करण्यात आली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *