पुण्यातील वानवडीत घरांना आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

पुण्यातील वानवडीतील शिवरकर चाळ येथे आग लागल्याची घटना घडली. आगीत ४ घरे पूर्ण जळाली तर ३ घरांना झळ लागली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. २० मिनिटानंतर अग्निशमन दलाने आग अटोक्यात आणली. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिवरकर चाळीत आग लागल्याची माहिती गुरुवारी रात्री अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. चाळीमधे पञ्याचे बांधकाम असलेल्या काही घरांना आग लागली होती. जवानांनी पाण्याचा मारा चोहोबाजूंनी सुरू केला. घरामधे कोणी अडकले नसल्याची खाञी केल्यानंतर २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. अग्निशमन दल वेळात पोहोचल्याने अनर्थ टळला. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, गृहपयोगी सर्व वस्तू जळाल्याने कुटुंबाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी महावितरण विभाग आणि पोलीस दल दाखल झाले होते.

अग्निशमन अधिकारी समीर शेख, कैलास शिंदे वाहनचालक समीर तडवी, संतोष गायकवाड तसेच जवान निलेश लोणकर, राहुल नलावडे, विशाल यादव, प्रकाश शेलार, जितेंद्र कुंभार, संदिप पवार यांनी आग आटोक्यात आणली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply