पुण्यातील पालखी मुक्कामस्थळी ४० सीसीटीव्ही कॅमेरे

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पुणे येथील पालखी मुक्कामस्थळी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार ही कार्यवाही महापालिकेच्या विद्युत विभागाकडून करण्यात येणार आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्या येत्या बुधवार आणि गुरुवारी (२२ जून, २३ जून) पुणे मुक्कामी आहेत. या दिवशी शहरात किमान दहा ते बारा लाख वारकरी मुक्कामी असतील, असा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी सूचना पोलिसांनी महापालिकेला केली होती.

त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाकडून निवडुंग्या विठोबा मंदिर परिसर आणि भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देण्यात आली. पोलिसांकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply