पुण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील एनडीए रस्त्यावर एका इमारतीच्या तळघरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्याच्या मालकासह २२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी पोलिसांनी १ लाख १२ हजारांच्या रोकडसह, जुगाराचे साहित्य आणि २० मोबाइल संच असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी भल्या पहाटे ही छापेमारी केली आहे.

पोलिसांनी जुगार अड्ड्याचा मालक बाळू सीताराम मराठे (वय ५१, रा. भुसारी कॉलनी, कोथरुड), जुगार अड्ड्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा इमारत मालक बाळासाहेब दांगट (रा. शिवणे, एनडीए रस्ता) यांच्यासह २२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

एनडीए रस्त्यावरील दांगट पाटील नगर परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळघरात अहोरात्र जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी पहाटे जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार अड्ड्याच्या मालकासह २२ जणां विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यासाठी बेकायदा वीज जोड घेतल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे. संबंधित जुगार अड्ड्यात जुगार खेळणाऱ्यांसाठी १५ टेबल आणि ६५ खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. पुण्याचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राजेंद्र कुमावत, बाबा करपे, मनीषा पुकाळे, नीलम शिंदे, इरफान पठाण आदींनी ही कारवाई केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply