पुण्यातील कोंढव्यात अमली पदार्थ तस्कराकडून दहा लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुणे : कोंढवा परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून दहा लाखांचे मेफेड्रोन आणि मोटार असा १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अदनान गुलाम दस्तगीर कुरेशी (वय ३२, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोंढव्यातील उंड्री-पिसोळी भागातील एका हाॅटेलजवळ एकजण मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कुरेशीला पकडले. कुरेशीची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून दहा लाख रुपयांचे ५२ ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, मोटार असा १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, एस. डी. नरके,संतोष देशपांडे, संदीप जाधव, चेतन गायकवाड, युवराज कांबळे आदींनी ही कारवाई केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply