पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली; रितेश कुमार 'हे' असतील नवे आयुक्त

पुणे : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. 

राज्यातील पंधरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनवर बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली मुंबई अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रितेश कुमार हे पुणे सीआयडीचे प्रमुख म्हणून अतिरिक्त पोलिस महासंचालक होते. सन १९९२ सालच्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत.

दुसरीकडे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक शहर पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता विनयकुमार चौबे हे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त असतील.

रितेश कुमार यांनी कोल्हापूर, सांगली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात काम केलं आहे. त्यांनी राज्य राखीव पोलीस दलात देखील काम केलं असून ते मुंबईत काहीकाळ पोलीस उपायुक्त राहिलेले आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ (AMBIS) या संगणकीय प्रणालीचा वापर रितेश कुमार यांच्या योगदानामुळं सुरू झाला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply