पुणे : GST विरोधातील आंदोलनाला व्यापाऱ्यांचा पाठिंबा; व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद

पुणे - देशभरात धान्यावरील जीएसटीविरोधात व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पुण्यातील व्यापाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. जीवनावश्यक वस्तूवर लादलेल्या पाच टक्के जीएसटी करा विरोधात आज पुण्यात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला आहे.

पुण्यातील मार्केट यार्ड परिसर आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला संपूर्ण भारतातील व्यापाऱ्यांसह पुण्यातील व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला आहे. केंद्र सरकार एकीकडे वन नेशन वन टॅक्सची घोषणा देते तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के टॅक्स आकारते त्याचबरोबर एपीएमसी मार्केटमध्ये देखील चार टक्के टॅक्स आकारात असल्याचा दावा पुण्यातली व्यापाऱ्यांनी केला आहे.

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवर पाच टक्के जीएसटी कर लादल्यामुळे प्रत्येक गृहिणीचे बजेट, हे एक हजार ते पंधराशे रुपयांनी वाढणार असून, त्यामूळे य देशात महागाई देखील वाढेल असं पुन्हा मर्चंट चेंबरच्या व्यापाऱ्यांचे म्हणणं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटी कर लादण्याचा निर्णय ताबडतोब मागे घेण्यावा, अशी मागणी पुणे मर्चंट चेंबरच्या वतीने करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने काही वस्तुंवरील जीएसटीमध्ये बदल केला आहे. जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा जीएसटी १८ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. यात काही रोजच्या दैनंदिन वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारपासून आपल्या खिशाला कात्री लागणार आहे. घरगुती वस्तू, हॉटेल आणि बँक सेवांसह इतर काही गोष्टींसाठी जास्त खर्च करावे लागणार आहेत. चंदीगड येथे झालेल्या जीएसटी (GST) कौन्सिलच्या ४७ व्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत कोही वस्तूंवरील जीएसीट (GST) ५ टक्क्यांवरुन १२ टक्के करण्यात आला आहे. छपाईच्या वस्तू, लेखन किंवा चित्र काढण्यासाठी वापरण्यात येणारी शाई, एलईडी दिवे, दिवे आणि फिक्स्चर आणि त्यांचे मेटल प्रिंटेड सर्किट बोर्ड महाग होणार आहेत. यापूर्वी या सर्वांवर १२ टक्के दराने जीएसटी आकारला जात होता, मात्र १८ जुलैनंतर हा कर १८ टक्के होईल. सोलर वॉटर हीटर्स आणि सिस्टीमवरील जीएसटी दर ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply