
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध योजनेतील ५०६८ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. १८ ऑगस्ट रोजी सोडत जाहीर होणार आहे.
म्हाडा पुणे विभागाकडून जून महिन्यात पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), कोल्हापूर आणि सांगली परिसरासाठी तब्बल ५०६८ सदनिका आणि मोकळया भूखंडांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, नवीन एकत्रिकृत बांधकाम नियमन प्रणालीनुसार (युडीसीपीआर) उत्पन्न मर्यादेचे नियम लादण्यात आल्याने सुरूवातीच्या आठवड्यात सोडतीला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, नव्या नियमांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे दोन दिवस ऑनलाइन अर्ज प्रणाली बंद करण्यात आली होती. आता अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तक्रारी प्राप्त झाल्याने उत्पन्न मर्यादेचे नियम मागे घेण्यात आले –
याबाबत माहिती देताना म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील म्हणाले, ‘राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडून बांधकाम नियमावली तयार करण्यात आल्याने त्याचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रांवर मोठया प्रमाणात झाला. विशेषतः म्हाडाच्या अंतर्गत सर्वसमावेशक योजनेतील (२० टक्के) सदनिका सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच नागरिकांच्या देखील तक्रारी प्राप्त झाल्याने उत्पन्न मर्यादेचे नियम मागे घेण्यात आले. त्यामुळे सुरूवातीला सोडतीला प्रतिसाद मिळाला नाही. तसेच दोन ते तीन दिवस ऑनलाईन प्रणाली बंद करण्यात आली होती. उत्पन्न मर्यादेची अट शिथिल केल्याने अर्ज येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार इच्छुकांना अर्ज भरण्यासाठीचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
४५ हजार ८६१ अर्ज प्राप्त –
जून महिन्यात म्हाडाकडून विविध योजनेंतर्गत ५०६८ सदनिकांमध्ये २७८ म्हाडाच्या सदनिका आहेत. २८४५ सदनिका प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर, तर १९४५ सदनिका सर्वसमावेशक योजनेतील असून एका महिन्यात ४५ हजार ८६१ अर्ज प्राप्त झाले आहेत, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.
१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार –
इच्छुकांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार असून, १ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. तसेच , ३ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पैसे भरण्याची मुदत आणि १८ ऑगस्ट रोजी ऑनलाईन सोडत जाहीर होणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


