पुणे : हॉटेलमध्ये झालेल्या वादात मांजरीचे माजी सरपंच जखमी

मांजरी : हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेल्या नेहमीच्या मित्रांमध्ये झालेला वाद सोडविल्यानंतर बाहेर पडत असताना अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच पुरूषोत्तम धारवाडकर जखमी झाले आहेत. काल (ता. ४) मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील श्रीमान हॉटेलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी धारवाडकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन मित्रांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

काल रात्री माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर हे एक विवाह समारंभ उरकून काही मित्रांसह श्रीमान हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांच्या टेबलवर बसलेले संजय झुरंगे व चंद्रकांत घुले यांची भांडणे झाली. धारवाडकर यांनी दोघांनाही समजावून सांगत ही भांडणे त्यावेळी मिटवली. मात्र, दरम्यान घुले यांनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. थोड्याच वेळात तीघेजण एका दुचाकीवरून तेथे आले व त्यातील एकाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी हॉटेलबाहेरील दगड विटा धारवाडकर यांच्या दिशेने फेकून मारल्या. त्यामध्ये धारवाडकरांच्या डोक्यात मार लागून ते जखमी झाले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply