पुणे – ‘हेलिना या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

पुणे - ‘हेलिना (Helina) या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची (Missile) यशस्वी चाचणी (Test) सोमवारी घेण्यात आली. उंच पर्वतरांगांमध्ये स्वदेशी बनावटीचा हेलिकॉप्टर (Helicopter) वापरून ही चाचणी करण्यात आली. ही चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) (DRDO) शास्त्रज्ञांचे गट, सैन्यदल आणि हवाईदलाने संयुक्तपणे घेतली. कठीण परिस्थितीत प्रशंसनीय कार्य पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्यदल व डीआरडीओचे अभिनंदन केले.

या चाचणीसाठी अत्याधुनिक लघु हेलिकॉप्टर (एएलएच) वापर करण्यात आले. तसेच कृत्रिम रणगाडा लक्ष्य निर्धारित करून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. पोखरण येथे झालेल्या प्रमाणीकरण चाचण्यांचा पुढील भाग म्हणून या क्षेपणास्त्राची आणि एएलएच यांच्या क्षमतेची चाचणी होती. क्षेपणास्त्र सोडण्या आधी इन्फ्रारेड इमेजिंग (आयआयआर) सिकर या तंत्राच्या वापराने क्षेपणास्त्राला दिशा निर्देश देण्यात आले. हे जगातील सर्वात आघाडीच्या आधुनिक रणगाडाविरोधी शस्त्रापैकी एक आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply