पुणे हादरलं! दोन मुलांसह पती-पत्नीची विष पिऊन आत्महत्या

पुण्यात एकाच परिवारातल्या चौघांची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंढवा परिसरात विषारी द्रव्य पिऊन या चौघांनी आत्महत्या केली आहे. यामागे काही आर्थिक समस्या हे कारण असल्याचं सांगितलं जात आहे

पुण्यातल्या मुंढवा परिसरात ही घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्यांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. दिपक थोटे (59), इंदू दिपक थोटे (45) मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (24) मुलगी समीक्षा दिपक थोटे (17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. दोन महिन्यापूर्वी ते मुंढवा भागातील केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते.

आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

हे दांपत्य २ महिन्यापूर्वी केशवनगर भागात एका घरात भाड्याने राहत होते. काल रात्रीपासून थोटे घराचा दार उघडत नसल्याने शेजारी रहात असलेल्या नागरिकांनी अनेक वेळा दरवाजा ठोठावला. थोटे दांपत्य दार उघडत नसल्याने शेजारी राहत असलेल्या काही नागरिकांनी त्यांचा दरवाजा उघडायचा प्रयत्न सुद्धा केला.

दरवाजा उघडला गेल्यानंतर त्यांना घरातील बेडरूम मध्ये ४ जणांचे मृतदेह आढळून आले. तात्काळ या घटनेची माहिती नागरिकांना पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, घरामध्ये इतरत्र काही संशयास्पद वस्तू सापडली नाही. घरात रात्रीचे जेवण दोन भाज्या व चपाती हे साहित्य मिळून आले असून ते ताब्यात घेतले आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *