पुणे : हांडेवाडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला

पुणे : तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने हांडेवाडी (ता. हवेली) परिसरात खळबळ उडाली आहे. हांडेवाडीतील शौर्य हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत १८ मार्च सायंकाळी साडेचार ते २० मार्च २०२२ दुपारी बाराच्या दरम्यान ही घटना घडली. सतीश मोहन चव्हाण (रा. हांडेवाडी, ता. हवेली, जि. पुणे) हा संशयित फरारी असून, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. करण रोहिदास हांडे (वय २०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रोहिदास मारुती हांडे (वय ५४, रा. मारुती मंदिरसमोर, हांडेवाडी, ता. हवेली, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार खून व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, करण याचा प्रेमविवाह झाला होता. तो हांडेवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होता. किरणचे आई-वडिल पुण्यात राहात असून, तो एका गॅरेजमध्ये कामाला होता. तो एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याला याच परिसरातील तीन ते चार मित्र आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री तसेच शनिवारी तो घरी न आल्याने त्याच्या पत्नीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलीस व त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना हांडेवाडी येथील पाटील व्ह्यु सोसायटीच्या मागील बाजूला मोकळ्या मैदानात दारू पिण्यास बसले होते, अशी माहिती मिळाली. नातेवाईकांनी तेथे येऊन पाहणी केली असता त्यांना मातीत पुरलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ ही माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या पथकाने याठिकाणी धाव घेतली. त्याचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला असण्याची शक्यता आहे. करण हांडे याचा खून नेमका कोणी केला हे अद्याप समजू शकले नसून आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर पुढील तपास करीत आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply