पुणे : हवेत गोळीबाराची आणखीन एक घटना; दहशत परवण्यासाठी तमा न बाळगता गोळीबार

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आपण भाई आहोत आणि परिसरात आपली दहशत असावी या उद्देशाने पुण्यातील लोहगाव येथे हवेत गोळीबार करण्याची खळबळजनक घटना घडली आहे. चार अज्ञात तरुणांनी हा गोळीबार केला. सध्या हे चौघे पेलिसांच्या ताब्यात आहेत. 

 
नितीन किसन सकट (वय.21), गणेश सखाराम राखपसरे (वय.21), पवन युवराज पैठणकर (वय.18,राहणार सर्व राखपसरे वस्ती लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय.22,रा.खेसे वस्ती) यांनी हा गोळीबार केला. या घटनेने परिसरात भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. अशात विमातळ पोलिसांनी या टोळक्याला ६ तासांच्या अटक केली आहे. तसेत त्यांच्या विरुद्ध दहशत पसरवणे आणि आर्म ऍक्टनूसार गुन्हा दाखल केला आहे.

सीसीटीव्हीत दिसत असलेल्या दृश्यांनुसार हे चौघे एकाच दुचाकीवर बसले होते. परिसरात आल्यावर त्यातील एकाने हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव पार्कमध्ये अशीच घटना घडली होती. यात दोन गटात वाद असल्याने भर रत्यात हवेत गोळीबार करण्यात आला होता. तसेच एका टोळक्याने तरुणाला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा लोहगावात अशी घटना घडली आहे.

पोलिसांनी या चारही जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच गोळीबार करताना वापरलेले पिस्तूलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटनेमुळे परिसरातील नागरिक अस्वस्थ आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply