पुणे : हडपसरमधील सुरक्षा रक्षक नगर परिसरात झोपड्यांना आग १२ झोपड्या भस्मसात

पुणे : हडपसर परिसरातील सुरक्षा नगरमध्ये लागलेल्या आगीत १२ झोपड्या जळाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरात सुरक्षानगरमध्ये झोपड्या आहे. पत्र्याच्या झोपड्यांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दोन बंब आणि टँकर दाखल झाले. जवान दत्तात्रय वाघ, सोमनाथ मोटे, संजय जाधव, विलास दडस, सत्यम चौखंडे, प्रदीप कोकरे यांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply