पुणे : सोसायटीचा मेंन्टनन्स न भरल्याने रहिवाशाला बेदम मारहाण, बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : सोसायटीचे देखभाल शुल्क (मेंन्टनन्स) न भरल्याने रहिवाशाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक साहेबराव फडतरे (वय ४०, रा. श्रीकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) असे जखमी झालेल्या रहिवाशाचे नाव आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक तुषार शहा (रा. खराडी) यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फडतरे यांनी या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फडतरे यांनी सोसायटीचा मेंन्टनन्स भरला नव्हता. या कारणावरून शहा यांनी फडतरे यांना शिवीगाळ केली. शहा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या दोघांनी फडतरे यांना गजाने मारहाण केली. मारहाणीत फडतरे यांचा हात फ्रॅक्चर झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *