पुणे : सेक्सटॉर्शन प्रकरणात मोहोळच्या आमदारांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न , राजस्थानातून एकाला अटक

समाजमाध्यमावर चित्रफीत तसेच छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्याकडून खंडणी उकळण्याचा (सेक्सटाॅर्शन) प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन एका आरोपीला राजस्थानमधील एका गावातून अटक केली.. आरोपीने ९० जणांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

रिझवान अस्लम खान ( वय २४, रा. सिहावली महारायपूर, जि . भरतपूर, राजस्थान ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.  न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. राजस्थानताील सिहावली महारायपूर गावात  सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून पैसे उकळण्याचा उद्योग अनेकजण करतात. मात्र, त्यांना दूरध्वनी क्रमांक कसे उपलब्ध झाले, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. सायबर गुन्हे शाखेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस आमदार माने, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील आदी उपस्थित होते.

आमदार माने मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  विधानसभेवर निवडून गेले आहेत. ते पुण्यात वास्तव्याला आहेत. यांच्या गेल्या गुरुवारी ( २ फेब्रुवारी) त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधला.  त्यानंतर एकापाठोपाठ त्या मोबाइलवरून त्यांना व्हिडिओ कॉल्स आले. संबंधित व्यक्ती महिलेच्या आवाजात माने यांच्याशी बोलत होती. त्यांना खंडणीसाठी धमकावत होती. अश्लील ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन आमदार माने यांच्याकडे एक लाख रुपये खंडणी मागितली. अशा पद्धतीने आरोपीने अनेकांना धमकावले असल्याचे लक्षात आल्यावर आमदार माने यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या तातडीने तपास सुरू केला. दूरध्वनी राजस्थानमधील भरतपूर परिसरातुन येत असल्याचे तांत्रिक विश्लेषणात निदर्शनास आले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे आणि पथक तेथे रवाना झाले.

गेल्या महिन्यात राजस्थानातील भरतपूर परिसरातील एका गावात पुणे पोलिसांनी कारवाई करुन सेक्सटॉर्शनचा प्रकार उघडकीस आणला होता. पुणे पोलिसांचे पथक आठवडाभर राजस्थानात तळ ठोकून होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने गुरुवारी आरोपी रिझवान याला अटक केली. आरोपी रिझवानने देशभरातील अनेकांना  खंडणीसाठी धमकावले आहे. त्याला सीमकार्ड तसेच बँक खाते उपलब्ध करुन देण्याऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

गेल्या वर्षभरात सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढीस लागले असून अशा प्रकारचे पाच गुन्हे पुण्यात दाखल झाले आहेत. खंडणीसाठी धमकावल्यामुळे पुण्यातील दोन युवकांनी आत्महत्या केल्या होत्या. धनकवडीतील युवक शंतनु वाडकर याने २८ सप्टेंबर २०२२ ला इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून इमारतीच्या उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर आणखी एका युवकाने आत्महत्या केली होती. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण पोलिसांकडे तक्रार देणे टाळतात, असे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply