पुणे : सुस म्हाळुंगे पाणीप्रश्न संदर्भात मा. नगरसेवक उच्च न्यायालयात

बालेवाडी : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी सुस म्हाळुंगे या गावांच्या पाणी प्रश्नासंदर्भात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पी.एम.आर डी. ए. व पुणे मनपा विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून यासंदर्भात बाणेर येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती देण्यात आली. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 23 गावांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये सुस, म्हाळुंगे या गावांचाही समावेश आहे. या गावांमध्ये नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांसाठी रोज झगडावे लागत आहे. येथे पाणी प्रश्न अतिशय बिकट असून या संदर्भात पी एम आर डी ए व पुणे मनपा या दोन्ही नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी अपयशी ठरले असल्याने मा. नगरसेवक अमोल बालवकर यांनी अँड. सत्या मुळे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यातील मुद्दे पुढील प्रमाणे 1) पीएमआरडीए व पुणे मनपा या नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात दुर्लक्ष करत आहे. दोन्ही ही पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्विकारत नाही. 2) येथे कायद्याप्रमाणे पीएमआरडीए बांधकाम नकाशे मंजूर करते तर पाणी देण्याची जबाबदारी सुद्धा पीएमआरडीए ने स्विकारली पाहिजे. जर असे होत नसेल तर पीएमआरडीए ने बांधकाम नकाशे मंजूर करणे थांबवावे, जेणेकरून या भागाचा पाणी प्रश्न अजून गंभीर होणार नाही. 3) तसेच या पिलं मध्ये मा.उच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे कि, या भागातील नागरिकांना मुलभूत गरज असलेले पाणी देण्याची जबाबदारी कोणाची..? हे स्पष्ट करावे. 4) जर पाणी देण्याची जबाबदारी पीएमआरडीए स्विकारत नसेल तर त्यांना बांधकाम नकाशे मंजूर करण्यासाठीचे अधिकार उच्च न्यायालयाने काढून घ्यावेत. 5) सध्या पीएमआरडीए पाण्याबाबत बिल्डरांकडून हमीपत्र घेत असून पाणी पुरवठा बिल्डरने करावा असं हे हामी पत्रात नमूद केलेले असते, हे पीएमआरडीए ने थांबवावे. 6) समाविष्ट गावातील सोसायटींना / बांधकामांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी पाण्याच्या टाक्या, पाण्याच्या पाईप लाईन्स व इतर मुलभूत पायाभूत सुविधा करण्याचे काम संबंधित यंत्रणेने सुरु करावे व तो पर्यंत या सोसायटींना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा. 7) तर मनपा ने समाविष्ठ गावांना पाणी पुरवठा करण्याबाबत आराखडा उच्च न्यायालयात सादर करावा. त्यासाठी किती महिने / किती वर्ष लागणार आहे हे स्पष्ट करावे. यावेळी बोलताना मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे मनपा व पीएमआरडीए यांच्यात कोणताही समन्वयं नाही, या भागातील नागरिक महापालिकेचा कर भरतात, पण तशा सुविधा जर मिळत नसतील तर त्यांनी कर का भरायचा असा प्रश्न उपस्थित केला. पाण्याचा आराखडा जो पर्यत तयार होत नाही तोपर्यंत या भागातील नागरिकांनी कर भरू नये असेही ते म्हणाले. यावेळी मा. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या समवेत अँड. सत्या मुळे तसेच मुख्य दैनिकांचे वार्ताहर उपस्थित होते.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply