पुणे : सिंहगड घाटात मोटारीला लागली आग

खडकवासला : सिंहगड घाटात आज रविवारी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास सिंहगडावर जाणार्‍या एका मोटारीला आग लागली होती. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु मोटार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

दरम्यान, वनविभागाचे संदिप कोळी, वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक तानाजी खाटपे, नितिन गोळे यांनी मोटारीला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. घाटातील वाहतुक व्यवस्था देखील सुरळीत केली.

सिंहगडावर MH15 EB8659 ही गाडी जात होती. गाडीला अचानक आग लागली. गाडीमध्ये मध्ये चार पाच पर्यटक होते. ते गाडी थांबवून बाहेर पडले. त्यामुळे ते वाचले. घाटातील शेवटच्या तीन किलोमीटरच्या टप्प्यात उंबरदांड परिसरात ही घटना घडली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply