पुणे : सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात; 135 शेड जमीनदोस्त करण्यात येणार

पुणे - प्रतापगडावरील अतिक्रमण कारवाईनंतर आता सिंहगडावरील असणारी हॉटेलची अतिक्रमण काढण्यास शुक्रवारी पहाटे सुरुवात झाली आहे. यासाठी गडावर दोन जेसीबी, एक डँपर, गॅस कटर अशी यंत्रणा गडावर पोचली आहे. या यंत्रणेकडून वाहनतळवरील हॉटेल वर कारवाईला सुरुवात झाली आहे. सकाळी सात वाजेपर्यंत पाच सहा हॉटेल पाडण्यात आली आहेत.

कारवाई करण्यासाठी वन विभागाची उपवनसंरक्षक यांच्या अखत्यारीत भांबुर्डा, पुणे(हवेली), मुळशी, ताम्हिणी येथील सर्व वनाधिकार्‍यांनी- वनकर्मचारी गडावर दाखल झाले आहेत यासह पोलिसांचा विशेष बंदोबस्त देखील यासाठी तैनात करण्यात आलेला आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *