पुणे : सारसबाग वॉकिंग प्लाझाचा मार्ग मोकळा; हमीपत्रानंतर व्यवसाय सुरू, स्टॅालधारकांना तूर्त दहा फूट जागा वापरण्यास मान्यता

पुणे : सारसबाग येथील नियोजित ‘वॉकिंग प्लाझा’ तयार करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॅालसमोर व्यावसायिकांनी फरशी टाकून केलेला रस्ता रूंद करण्यात आला आहे. रस्त्यालगतची केवळ दहा फूट जागा व्यावसायिकांना वापरण्यास परवानगी मिळणार आहे. शेड न उभारण्याचे तसेच खुर्च्या हटवून रस्ता मोकळा करण्याचे हमीपत्र व्यावसायिकांकडून घेत व्यवसायायाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सारसबाग चौपाटी परिसरात वॉकिंग प्लाझा सुरू होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सारसबाग येथील खाद्यपदार्थांच्या स्टॅालवर कारवाई करत ते सील केले होते. रस्त्यावर टाकण्यात आलेले टेबल, खुर्च्यांसह अन्य साहित्य महापालिका प्रशासनाने कारवाई वेळी जप्त केले होते. या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले होते. पथारी संघटनांबरोबरच राजकीय पक्षांनी व्यावसायिकांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र सारसबाग परिसरात वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी घेतला होता. व्यावसायिकांनी अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र दिल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास मान्यता दिली जाईल, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली होती.

रस्त्यावर टेबल, खुर्च्या ठेवण्यात येणार नाही. शेड टाकण्यात येणार नाही, असे हमीपत्र घेऊन व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हमीपत्र मिळाल्यानंतर प्रशासनाकडून रस्ता रुंद करण्यात आला असून सध्या केवळ रस्त्याची दहा फूट जागा वापरण्यास व्यावसायिकांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे वॉकिंग प्लाझा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply