पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने अजित पवार यांच्या हस्ते ‘लोकसत्ता’चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांना वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, ‘सामना’च्या मेधा पुंडे-पालकर, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या अलका धूपकर, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे जुन्नर येथील प्रतिनिधी धर्मेद्र कोरे आणि ‘एबीपी माझा’चे उस्मानाबाद येथील प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना आश्वासक पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी अजित पवार बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, विश्वस्त अंकुश काकडे आणि डॉ. सतीश देसाई या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले,की महाराष्ट्रातील ऐक्य आणि सलोखा टिकून राहण्यासाठी माध्यमांनी नको त्या मुद्दय़ाला अनावश्यक महत्त्व देणे,त्या बाबतचे फोटो वगैरे थांबवले पाहिजे. त्यामुळे जातीय ध्रुवीकरण होऊन भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही यासाठी समाजमाध्यमांनी बातमी प्रसारित करण्याआधी शहानिशा करणे गरजेचे आहे. मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि आता समाज माध्यमे असे स्थित्यंतर होत असताना पत्रकारितेची मूल्ये हरवणार नाहीत याची दक्षता घेतली गेली पाहिजे. भावे म्हणाले,की सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडले असून राजकीय पक्ष केवळ आरोप-प्रत्यारोपांमध्येच व्यग्र आहेत आणि ती भांडणे दाखविण्यात माध्यमे गुंतून पडली आहेत. अघोषित हुकूमशाहीविरोधात बोलण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदच का आवश्यक ठरते?, असा प्रश्न मला पडतो. महाराष्ट्राची घडी विस्कटणार नाही, याची काळजी घेणे ही पत्रकार आणि राजकीय पक्ष यांची जबाबदारी आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे केंद्रातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन अभ्यासक्रमात प्रथम आलेला रोहित वाळिंबे आणि ‘चालू घडामोडी’ या विषयात प्रथम आलेला आतिक शेख या विद्यार्थ्यांना अजित पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. रिकामटेकडय़ांना प्रसिद्धी देऊ नका
समाजाच्या ध्रुवीकरणाचा होत असलेला प्रयत्न माध्यमांनी समाजामोर आणला पाहिजे. रिकामटेकडय़ांना प्रसिद्धी देऊ नये, अशा शब्दांत अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून माध्यमांकडून अपेक्षा व्यक्त केली. विकासासाठी एकजुटीने काम करताना माध्यमांनी केलेल्या विधायक सूचनांचे मनापासून स्वागत करू, असेही पवार यांनी स्पष्ट केले. भिडे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ
पत्रकार म्हणून काम करताना वरुणराज भिडे यांच्या मार्गदर्शनाचा मला लाभ झाला, अशी कृतज्ञता व्यक्त करून संतोष प्रधान यांनी भिडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रधान म्हणाले,की राज्याच्या निवडणुकीसाठी २८८ उमेदवारांची घोषणा झाली. या यादीमध्ये कोणकोणत्या आडनावाचे किती उमेदवार आहेत याचा अभ्यास कर, असे त्यांनी मला सांगितले होते. त्याच धर्तीवर भिडे यांनी त्या वेळी केलेली बातमी गाजली होती. मी ठाण्याला राहात असल्याने वसई येथील निवडणुकीचे वार्ताकन तू कर, असे सांगून त्यांनी मला प्रोत्साहन दिले होते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


