पुणे : सकाळपासूनच पुण्यात पावसाची संततधार

पुणे : विदर्भ मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी, पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः घाट माथ्यावर सकाळपासूनच मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरातही सकाळपासूनच हलक्या स्वरूपाच्या जोरदार सरी कोसळत आहे.

मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात आकाश प्रामुख्याने ढगाळ आहे. मात्र घाटमाथा वगळता उर्वरित भागात पावसाने काहीशी उघडीप घेतली होती. घाटमाथ्यावर ताम्हिणी सारख्या ठिकाणी तब्बल १०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने शहरात सर्वत्र हजेरी लावली आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस असला तरी संततधार पडणाऱ्या सरींनी पुणेकरांच्या अडचणीत वाढ केली आहे. चाकरमान्यांना कामाचे ठिकाण गाठण्यासाठी तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरतच करावी लागत आहे. त्यात शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडी अडचणींत अधिक वाढ करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply