पुणे : श्वानाला फेरफटका मारणाऱ्या महिलेचा विनयभंग; बालेवाडीतील घटना

पुणे : श्वानाला फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बालेवाडी भागात घडली. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली होती. बालेवाडीतील मोझे महाविद्यालय परिसरात एका तरुणाने महिलेचा विनयभंग केला.

महिलेने आरडओरडा केल्यानंतर तरुण पसार झाला. पसार झालेल्या तरुणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. गेल्या महिन्यात ओैंध भागात मध्यरात्री पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *