पुणे: शेतकरी मोर्चामुळे डेक्कन जिमखाना भागात वाहतूक कोंडी

पुणे : उस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी काढलेल्या मोर्चामुळे डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनचालक कोंडीत अडकून पडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

उस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोमवारी शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, गोखले स्मारक चौक, खंडोजीबाबा चौक भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मोटारचालक तसेच दुचाकीस्वारांना कोंडीत अडकून पडावे लागले. माेर्चासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. मोठ्या संख्येने शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याने या डेक्कन जिमखाना भागातील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली. त्यामुळे ड़ेक्कन जिमखाना भागात कोंडी झाली, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *