पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला २२ लाखांचा गंडा

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाला २१ लाख ८७ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरट्याच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फस‌वणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार ज्येष्ठ नागरिक वानवडी भागात राहायला असून ते सेवानिवृत्त आहेत. चोरट्याने शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारे एक लिंक ज्येष्ठ नागरिकाला पाठविली होती. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर ज्येष्ठ नागरिकाने संपर्क साधला. तेव्हा शेअर बाजारातील व्यवहारासाठी खाते उघडावे लागेल, असे सांगून चोरट्याने त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतले.

त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे बतावणी करुन चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाकडून पैसे उकळले. चोरट्याने ऑनलाइन पद्धतीने ज्येष्ठ नागरिकाकडून २१ लाख ८७ हजार रुपये घेतले. ज्येष्ठ नागरिकाला कोणताही परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित शिवले तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply