पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीचं दाखवलं आमिष; पुण्यातील व्यावसायिकाला ६० लाखांचा गंडा

गेल्या काही दिवसात पुण्यासह महाराष्ट्रात शेअर बाजारात गुंतवणुकीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. अशात पुण्यातील एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६० लाख ८८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर व्यावसायिकानं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

देवीका कुलकर्णी, समर सक्सेना, अनुराग, अमित आणि देवयानी नारंग असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. याप्रकरणी अनिकेत सतीश देशपांडे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर, ओैंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशपांडे हे व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी देशपांडे यांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला होता.

आरोपींनी गॅलक्सी ट्रेडर्स कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येत असल्याची बतावणी केली होती. तसेच गुंतवणुकदारांना गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा देण्यात येणार असल्याचे आमिष देशपांडे यांना दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर फिर्यादी देशपांडे यांनी आरोपींच्या बँक खात्यात वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ६० लाख ८८ हजार रुपये जमा केले होती.

पण आरोपींनी देशपांडे यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर देशपांडे यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply