पुणे : शिक्षक भरतीसाठी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे पुण्यात उपोषण सुरू

पुणे : शिक्षक भरतीच्या मागणीसाठी डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे पुण्यात उपोषण सुरू करण्यात आले. कोण म्हणतो देत नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, शिक्षक भरती झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यात २०१९ मध्ये १२ हजार पदांसाठीची शिक्षक भरती पवित्र संकेतस्थळातर्फे सुरू करण्यात आली. मात्र चार वर्षे होऊनही अद्याप शिक्षक भरती झालेली नाही. त्यात आता आणखी ३० हजार शिक्षकांची पदे भरण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. या पार्श्वभूमीवर रखडलेली शिक्षक भरती करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील उमेदवारांसह डीटीएड बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे पुण्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले.

शिक्षक भरती प्रक्रियेतील माजी सैनिक, अपात्र, गैरहजर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करावी, समांतर आरक्षणात झालेला अन्याय दूर करावा, विभागनिहाय शिक्षक भरती करण्यात येऊ नये, भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने न करता एकाच टप्प्यात केंद्रीय पद्धतीने पूर्ण करावी, शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने लवकरात लवकर घ्यावी आदी मागण्या असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply