पुणे : शाळेत निघालेल्या दोन विद्यार्थीनींचा कंटेनरच्या धडकेत दुर्देवी मृत्यू; चालक फरार

पुणे: शाळेत निघालेल्या दोन मुलींना कंटेनरची धडक बसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा दुर्देवी अपघात झाल्यानंतर कंटेनर ड्रायव्हर फरार झाला आहे. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात आज सकाळी ७ वाजता ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली त्यांच्या मामासोबत दुचाकीवरुन शाळेत निघाल्या होत्या. यावेळी कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. छकुली कुमार शितोळे (वय १७) आणि राजश्री कुमार शितोळे (वय- १० दोघीही रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. छकुली ही ११ वी ला तर राजश्री 6 वी च्या वर्गात शिकत होती. पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये त्या शिक्षण घेत होत्या. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *