पुणे : शादी डॅाट कॅामवरील ओळखीतून तरुणीवर बलात्कार ; २५ लाखांना गंडवले

शादी डॅाट कॅाम या विवाह विषयक संकेतस्थळावर ओळख झालेल्या एका तरुणाने २८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वेगवेगळी कारणे सांगत तिच्याकडून २५ लाख रुपये रक्कम घेऊन तरुणीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  संबंधित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी शंतनू बाळासाहेब महाजन (वय २८, रा. खराडी,पुणे) या आरोपीस अटक केली आहे. 

तक्रारदार तरुणीने शादी डॅाट कॅाम या विवाह संकेतस्थ‌ळावर नावनोंदणी केली होती. आरोपी शंतनू महाजन यानेही संकेतस्थ‌ळावर नावनोंदणी करून या तरुणीशी ओळख करून घेतली. त्यानंतर मैत्रीचा बहाणा करून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करून तिची इच्छा नसतानाही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या मोबाईलवर तिच्या नावे वेगवेगळे ॲप डाऊनलोड करून त्यावरुन वेळोवेळी कर्ज आणि पैसे घेऊन २५ लाख रुपये घेतले. तिच्यासोबत लग्न न करता तसेच परस्पर दुसऱ्या तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केली.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *