पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये १५ सदस्यांची निवड

पुणे : ऊस संशोधन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ‘गव्हर्निंग कौन्सिल’च्या निवडणुकीत १५ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. ‘व्हीएसआय’चे महासंचालक तथा निवडणूक समितीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी ही माहिती दिली.

‘गव्हर्निंग कौन्सिल’ मध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे : श्रीराम शेटे (कादवा सहकारी साखर कारखाना, राजारामनगर, दिंडोरी), नरेंद्र घुले पाटील (लोकनेते मारुतराव घुले पाटील साखर कारखाना, नेवासा, जि. नगर) सुरेश कुमार नाईक (आदिवासी साखर कारखाना नवापूर, जि. नंदुरबार), अशोक पवार (रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखाना शिरूर, जि. पुणे), बबनराव शिंदे (विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना माढा, जि. सोलापूर), अरविंद गोरे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, उस्मानाबाद), सतेज पाटील (डॉ. डी. वाय. पाटील कारखाना गगनबावडा, जि. कोल्हापूर),

प्रकाश आवाडे (जवाहर शेतकरी कारखाना हुपरी, जि. कोल्हापूर), विश्वजीत कदम (डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना वांगी, जि. सांगली), बाळासाहेब पाटील (सह्याद्री साखर कारखाना कराड, जि. सातारा), दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, लातूर), राजेश टोपे (कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना अंबड, जि. जालना), गणपतराव तिडके (भाऊराव चव्हाण साखर कारखाना अर्धापूर, जि. नांदेड), रोहित पवार (बारामती ऍग्रो बारामती, जि. पुणे) आणि हर्षवर्धन पाटील (इंद्रेश्वर शुगर मिल्स बार्शी, जि. सोलापूर).



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply