पुणे : व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

पुणे : व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. अनिकेत अरविंद कर्णिक (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत कुंडलिक पांडुरंग सोनटक्के (वय ४४, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी कर्णिक याची पत्नी विनिता अमित कर्णिक उर्फ विनिता जगतराम जोशी (वय ४०) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्णिक यांनी सोनटक्के यांना खासगी कंपनीत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चार महिन्यांपूर्वी दाखविले होते. सोनटक्के यांच्याकडून २९ लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर सोनटक्के यांना परतावा दिला नाही.

Follow us -

सोनटक्के यांनी परताव्याबाबत विचारणा केली. तेव्हा कर्णिक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अनिकेत कर्णिक याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply