पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; एकाच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शिवप्रसाद विठ्ठलराव दुधाटे (वय ३५,रा. उमरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आली आहे. दुधाटे याने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रुपनर तपास करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *