पुणे : विद्यार्थ्यांना प्रतीक्षा वसतिगृहाच्या यादीची

पुणे : शैक्षणिक वर्ष संपत आले तरी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्याची वाट विद्यार्थ्यांना पाहावी लागत आहे. १ फेब्रुवारी रोजी लागणारी प्रतिक्षा यादी अद्यापही जाहीर झाली नाही. यावर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून प्रतिक्षा यादी शैक्षणिक वर्ष संपल्यावर लावणार का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शासकीय वसतिगृहे बंद होती. सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर महाविद्यालये सुरु झाली. त्यामुळे गावी असलेले विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी दाखल झाले. मात्र शासकीय वसतिगृहेच सुरु झाली नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत होता. ‘सकाळ’ने याला वाचा फोडताच राज्य सरकारने वसतिगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली. काही विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतला तर काहींना प्रतिक्षा यादीत नाव येण्याची अपेक्षा आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यात लागणारी प्रतिक्षा यादी दोन महिने झाले, तरी प्रसिद्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply