पुणे : विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणुकीसाठी आतापर्यंत ५१ हजार जणांची नोंदणी ; विविध घटकांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ५१ हजार जणांनी नावनोंदणी केली आहे. या नोंदणी प्रक्रियेसाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली असून, पदवीधरांना १४ जुलैपर्यंत, प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना १३ जुलैपर्यंत तर संस्था प्रतिनिधी मतदारसंघासाठी १० जुलैपर्यंत नोंदणी करता येणार येईल. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाची निवडणूक प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे. या प्राधिकरणाची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे.

मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने election.unipune.ac.in हे वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधरासह विविध घटकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. या प्रक्रियेत जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. विद्यापीठाने यापूर्वी नावनोंदणी प्रक्रियेत पदवीधरांना ४ जुलै, शिक्षक, प्राचार्य आणि विभागप्रमुखांना ३ जुलै, संस्था प्रतिनिधींना ३० जूनची मुदत दिली होती. मात्र या नोंदणीसाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी धेय्य धोरण ठरवण्यात विद्यापिठाच्या विविध प्राधिकरणांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या निवडणुकीसाठी पदवीधर, शिक्षक, विभागप्रमुख आणि संस्थाचालक या सर्व घटकांच्या व्यापक सहभागातून लोकशाही प्रक्रिया बळकट होईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. नावनोंदणीसाठी https://election.unipune.ac.in/EleApp/Registration/Rg_Registration2017.aspx या दुव्याद्वारे करता येईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply